पेट्रोल दरवाढीचा सोशल मीडियावर भडका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

औरंगाबाद - ‘गाडी’ आज उभी केली दारी,
‘सायकल’ घेऊन 
निघालो कामावरी
पूर्ण होवोत तुमच्या 
मनातील इच्छा
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ‘पेट्रोल’
दरवाढीच्या हार्दिक शुभेच्छा...!

काही महिन्यांपासून पेट्रोल दरवाढीचा वाढता आलेख पाहून विरोधी पक्षांकडून निदर्शने होत असताना सर्वसामान्य नेटकऱ्यांकडूनदेखील अशा शब्दांत सोशल मीडियावर संतापाचा भडका उडाला आहे. 

पेट्रोलचे दर ८६ रुपयांवर, तर डिझेलचे भाव ७३ रुपये प्रतिलिटरवर पोचले आहेत. त्यामुळे याचा भडका व्हॉट्‌सॲप, फेसबुक व ट्विटर यासारख्या सोशल मीडियावर उडाला आहे. 

सोशल मीडियावर अनेक गमतीशीर; पण तेवढ्याच कठोर प्रतिक्रिया व टीका शासनावर होताना दिसत आहेत. या टीकांमुळे सरकारला जाग येणार का? असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

गमतीशीर कमेंट्‌स 
 मी काय म्हणतोय कुणी आत्मदहन करू नये, म्हणून पेट्रोलचे दर वाढविले आहेत -  सरकार
पेट्रोल @८६ प्रतिलिटर, कर्नाटकची सत्ता गेल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी बदला घेत आहेत - सूड दुर्गे सूड

Web Title: Petrol price hike Social Media joke