पेट्रोलपंपचालकांचे आज आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

औरंगाबाद - राज्यातील पेट्रोलपंप चालकांनी कमिशन वाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी (ता. 10) इंधन खरेदी न करण्याचा निर्णय पेट्रोलपंप चालकांनी घेतला आहे. पेट्रोल वितरकांच्या "फामपेडा' संघटनेच्या वतीने औरंगाबादमध्ये मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास येत्या रविवारपासून साप्ताहिक सुटी आणि सोमवारपासून रात्रीच्या वेळी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. सद्य:स्थितीला पेट्रोलपंप चालकांना डिझेलला प्रतिलिटर एक रुपया 45 पैसे एवढे कमिशन मिळते. या उलट पेट्रोलपंपाचा व्यवस्थापन खर्च सोयी-सुविधा पाहता हे कमिशन अत्यंत कमी असल्याने व्यवसाय करणे कठीण जात असल्याचे पेट्रोलपंप चालकांचे म्हणणे आहे. मागण्यांसदर्भात सरकारकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचे संघटनेचे सदस्य केयूर परीघ व राजीव मुंदडा यांनी सांगितले.
Web Title: petrol pump owner agitation