गंगापूरात पेट्रोल घेऊन जाणार टॅंकर पलटी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

औरंगाबाद रस्त्यावर पेट्रोल घेऊन जाणारा टॅंकर शनिवारी (ता.28) पलटी झाला. येथील रस्त्याचे काम सुरू असल्याने अर्धा रस्ता खोदण्यात आला आहे. अंदाज न आल्याने एकाच दिशेला जाऊन रस्त्याच्या खाली पेट्रोल टॅंकर पलटल्याची घटना घडली. सुदैवाने अगोदर शहरात दमदार पाऊस झाल्याने पाणी साचले होते. तसेच पेट्रोलची गळती कमी झाल्याने टॅंकरला आग लागली नाही.

गंगापूर (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद रस्त्यावर पेट्रोल घेऊन जाणारा टॅंकर शनिवारी (ता.28) पलटी झाला. येथील रस्त्याचे काम सुरू असल्याने अर्धा रस्ता खोदण्यात आला आहे. अंदाज न आल्याने एकाच दिशेला जाऊन रस्त्याच्या खाली पेट्रोल टॅंकर पलटल्याची घटना घडली. सुदैवाने अगोदर शहरात दमदार पाऊस झाल्याने पाणी साचले होते. तसेच पेट्रोलची गळती कमी झाल्याने टॅंकरला आग लागली नाही.

या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी मोठा अनर्थ टळला. शेकडो लिटर रस्त्याच्या कामात साचलेल्या पाण्यात पडल्याने पेट्रोलचा वास सुटला होता. औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक बंद झाली होती. पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol Tanker Accident In Gangapur City