टँकर उलटताच पेट्रोल घेण्यासाठी उडाली झुंबड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

पाचोड - औरंगाबादहून घनसावंगी येथील पंपासाठी पेट्रोल घेऊन जाणारा टँकर उलटताच त्यातुन पेट्रोल काढण्यासाठी झुंबड उडाल्याची घटना बुधवारी (ता. नऊ) सकाळी दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रोहिलागड फाट्याजवळ घडली.

पेट्रोलचा टँकर उलटल्याची माहीती मिळताच आजुबाजूच्या गावातील वाहनधारकांसह तरुणांनी, वाटसरुनी रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकचे कॅन घेऊन घटनास्थळी धाव घेतली. व रस्त्यावर सांडणारे पेट्रोल बाटल्यात भरून घेण्यास सुरुवात केली. पेट्रोल मिळविण्यासाठी एकच झुंबड उडाल्याने टँकर चालक व किलनर गांगरून गेले. 

या घटनेची माहीती मिळताच पाचोड (ता. पैठण) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी सहकाऱ्यासमवेत घटनास्थळ गाठले.  पेट्रोलची लुट करणाऱ्यांना पोलिसांनी हुसकावून लावले. यात टँकर चालक किरकोळ जखमी झाला. टँकर धडकलेल्या विजेच्या खांबावर विज नसल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. रस्त्याने जाणाऱ्या वाहन धारकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याऐवजी पेट्रोल लुटीकडे मोर्चा वळविला होता.

Web Title: petrol tanker accident near pachod