सिद्धेश्‍वर सहकारी कारखान्यावर पीएफ जप्तीची कारवाई

सिद्धेश्‍वर सहकारी कारखान्यावर पीएफ जप्तीची कारवाई

औरंगाबाद : सिल्लोडजवळील माणिकनगरातील सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखानाने वीस वर्षांपासून पीएफ संबंधित भविष्य निधी व संबंधित देय क्षति, डेमेजेस व्याज असे एक कोटी 42 लाख 56 हजार रूपये थकविल्याप्रकरणी भविष्य निर्वाह निधी, क्षेत्रीय कार्यालयाने बुधवारी (ता.16) कारखान्याच्या अस्थापनाची जंगम मालमत्ता जप्त केली. नवीन वर्षांतील पहिली मोठी कारवाई पीएफने केली आहे. 

सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे पीएफ रेकॉर्डनुसार कार्यकारी संचालक स.आर. पिसाळ आहे. कारखान्यांने एप्रिल 1996 ते मार्च 2016 पर्यंत भविष्य निधी, या संबंधित देय, क्षति, डेमेजेस व्याज मिळून 1 कोटी 42 लाख 56 हजार 749 रुपये भरले नाही. वारंवार सूचना, नोटीसा देऊनही कारखान्याने पीएफ संबंधीचा हा भरणा केला नसल्याने पीएफचे क्षेत्रीय आयुक्‍त एम.एच. वारसी यांच्या मार्गदर्शनाखाली ईपीएफओ औरंगाबादचे अधिकारी एस. आर. वानखडे, रशीद शेख, पयर्वक्षक एस.आर टाकळकर आणि अरूण मगरे यांनी कारखान्याची मालमत्ता सील केली. सध्या हा कारखाना भाजपच्या ताब्यात आहे. त्यापूर्वी हा काँग्रेसकडे होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com