हुतात्मा जवान मुस्तापुरे यांना साश्रूनयनांनी निरोप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पालम (जि. परभणी) - शस्त्रसंधीचा भंग करीत पाकिस्तानने जम्मू-काश्‍मीरमधील कृणघाटी भागात केलेल्या गोळीबारात हुतात्मा झालेले भारतीय लष्करी जवाना शुभम सूर्यकांत मुस्तापुरे यांच्यावर गुरुवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी, कोनेरवाडी (ता. पालम) येथे विराट जनसमुदायाच्या साक्षीने सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. 

लष्करी अधिकाऱ्यांनी विमानाने हुतात्मा शुभम यांचे पार्थिव बुधवारी (ता. 4) रात्री औरंगाबादच्या विमानतळावर आणले. रुग्णवाहिकेतून ते कोनेरवाडीला पाठविण्यात आले. सरकारच्या वतीने पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. लष्करी जवानांसह पोलिस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. सूर्यकांत मुस्तापुरे व कुटुंबीयांनी शुभम यांचा दफनविधी केला. 

अंत्यदर्शनासाठी गर्दी 
शुभम यांचे पार्थिव आज पहाटे चाटोरी (ता. पालम) येथे आणण्यात आले. तेथून ते कोनेरवाडीला नेत असताना मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाले. परिसरातील ग्रामस्थांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

Web Title: pharbani news Martyr Jawan Shubham Mustapure