औरंगाबादमध्ये बी.फार्मसीच्या विद्यार्थाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

औरंगाबाद - बी.फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थ्याने लगतच राहणाऱ्या चुलत भावाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी मध्यरात्री चिकलठाणा भागातील चौधरी कॉलनीत उघडकीस आली. शामसुंदर लक्ष्मण मैद (वय 20, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) असे आत्महत्या करणाऱ्या विद्याथ्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शामसुंदर बी. फार्मसीचे शिक्षण घेत होता. बुधवारी (ता. 13) संध्याकाळी शामसुंदरचे वडील कामावरून घरी आले. शामसुंदर घरी नसल्याने त्याला वडिलांनी अनेक वेळा कॉल केले. परंतु, त्याने कॉल रिसिव्ह केले नाही. वडिलांनी नातेवाईक कडे विचारपूस केली असता त्याचा पत्ता लागला नाही. त्यानंतर लगत राहणाऱ्या भावाच्या खोलीत जाऊन पाहिले असता, खोलीचा दरवाजा आतून बंद दिसून आला. दरवाजा तोडून नातेवाईकांनी पाहिले असता त्याने दोरीच्या साह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. 

या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची बाब समोर आली असून, त्याला काही दिवसांपूर्वी धमकावण्यात आले होते. त्यातून ही आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.

Web Title: Pharmacy student commits suicides in Aurangabad