esakal | माणूसकीचे दर्शन : हिंगोलीत कोरोना बाधित मयतावर शिवसैनिकांनी केला अंत्यसंस्कार

बोलून बातमी शोधा

मृतदेह
माणूसकीचे दर्शन : हिंगोलीत कोरोना बाधित मयतावर शिवसैनिकांनी केला अंत्यसंस्कार
sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : विस टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या शिवसेनेच्या शिकवणीचे प्रत्यय सेनगाव येथे आले. त्याचे असे झाले की, येथे कोरोनामुळे गुरुवारी (ता. २९) एका साठ वर्षीय निराधार रुग्णाचा मृत्यू झाला. परंतु त्यांना नातेवाईक नसल्यामुळे त्याच्या पार्थीवावर शिवसैनिकांनी अंत्यसंस्कार करुन माणूसकीचे दर्शन घडविले.

सेनगाव शहरासह तालुक्यात कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होत चालली आहे. मृत्युची संख्या सुध्दा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी शहरातील एका ६० वर्षीय कोरोना बाधित नागरिकाचा मृत्यू झाला. सदरील नागरिकाला ताप आणि श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी ही बाब नगरपंचायत प्रशासन, आरोग्य विभागाला सांगितली. परंतु आरोग्य विभागाकडून कोव्हिड सदृश्य रुग्ण असल्याने कुणीही वैद्यकीय अधिकारी हजर झाला नाही. नगरपंचायतचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी या रुग्णा संबंधित माहिती तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना सांगितली. मात्र प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.

हेही वाचा - कोरोना संकटात नांदेडची आरोग्य यंत्रणा प्रभारीच्या खांद्यावर; लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज

मयत नागरिकास जवळचे कुणीच नातेवाईक नसल्याने शेवटी शिवसेनेने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्धार घेतला. नगरपंचायत प्रशासनाने पीपीई किट पुरवठा केला. त्यानंतर उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रवीण महाजन, युवासेना तालुकाप्रमुख जगदीश गाढवे, दासराव फटांगळे, सचिन दिनकर यांनी पीपीई किट परिधान करुन अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी केली. नगरपंचायतने वीरशैव- नाथजोगी स्मशाणभूमीत अंत्यसंस्कारची तयारी केली. मृत शरीर नेण्यासाठी रुग्णालयात अंब्युलन्ससाठी संपर्क केला. परंतु त्यांच्याकडून सुध्दा कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक ट्रैक्टर, अॅटो चालकांना ही संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु कोरोनामुळे मृत्यु झाल्यामुळे कोरोनाच्या धास्तिने कुणीही येण्यास तयार झाले नाही. शेवटी शिवसैनिकांनी सदरील मृत शरीर बाजेच्या खाटेवर ठेवून स्वतः च्या खांद्यावरच नाथजोगी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संदेश देशमुख यांनी स्वतः अग्निदाह दिला.

संपादन- प्रल्हाद कांबळे