मतदान करताना काढले फोटो, जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

परभणी : परभणी लोकसभा मतदार संघातून अमुक एका उमेदवाराला मतदान केल्याचे फोटो काढून ते सोशल मिडियावर व्हायरल केले जात आहेत. या प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून कारवाईच्या सुचना दिल्या आहेत.

परभणी लोकसभा मतदार संघात सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानादरम्यान काही उत्साही कार्यकर्त्यांनी सरळ मतदान केल्याचे मोबाईलव्दारे फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मिडियावर व्हायरल केले. या प्रकारामुळे गुप्त मतदान पध्दती धोक्यात आली आहे. या प्रकाराची जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक आहे. अश्या प्रकार करणाऱ्यावर व संबंधीत मतदान केंद्रअध्यक्षावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Web Title: photo taken while voting and collectors takes action