राज्य राखीव दलाच्या भरतीचे छायाचित्रीकरण जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

हिंगोली - येथील राज्य राखीव दलाच्या भरती प्रक्रियेत पोलिस उपाधिक्षक राहूल मदने यांच्या पथकाने मंगळवारी (ता. १५) राज्य राखीव दलामधे जाऊन सन २०१७ मधील संपूर्ण भरतीचे छायाचित्रीकरण जप्त केले आहे. 

हिंगोली - येथील राज्य राखीव दलाच्या भरती प्रक्रियेत पोलिस उपाधिक्षक राहूल मदने यांच्या पथकाने मंगळवारी (ता. १५) राज्य राखीव दलामधे जाऊन सन २०१७ मधील संपूर्ण भरतीचे छायाचित्रीकरण जप्त केले आहे. 

राखीव दलाच्या भरती घोटाळा प्रकरणात यापूर्वी वीस उमेदवारांवर गुन्हा दाखल झाला होता. या जवानांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले होते. त्यानंतर पोलिस उपअधिक्षक राहूल मदने, पोलिस निरीक्षक अशोक मेराळ यांच्या पथकाने सोमवारी वीस जवानांच्या उत्तर पत्रिका जप्त केल्या होत्या. त्यानंतर आणखी दोन जवानांच्या उत्तरपत्रिके बाबत संशय आल्याने पोलिसांनी आणखी दोन उत्तर पत्रिका जप्त केल्या आहेत. त्यामुळे आता आणखी दोन जवानांवर गुन्हा दाखल होणार आहे. 

त्यानंतर आज पोलिसांच्या पथकाने या भरतीचे संपूर्ण छायाचित्रीकण ताब्यात घेतले आहे. या छायाचित्रीकरणाची सखोल तपासणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय छायाचित्रीकरण तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात सर्व पूरावे ताब्यात घेतल्यानंतर आरोपींच्या अटकेची कारवाई केली जाणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: Photocopy of state reserve police recruitment seized

टॅग्स