चोरट्यानी पळविला पीआयचाच मोबाईल

प्रल्हाद कांबळे
रविवार, 2 डिसेंबर 2018

 नांदेड पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका बेसावध पोलिस निरीक्षकास मोबाईल चोरट्यांनी झटका देत त्यांचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. हा प्रकार शुक्रवारी (ता. ३०) रात्री आठच्या सुमारास आठवडी बाजारात घडला.

नांदेड :  नांदेड पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका बेसावध पोलिस निरीक्षकास मोबाईल चोरट्यांनी झटका देत त्यांचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. हा प्रकार शुक्रवारी (ता. ३०) रात्री आठच्या सुमारास आठवडी बाजारात घडला.

बॉम्ब शोधक व नाशक पथकात कार्यरत पोलिस निरीक्षक मधुसूदन अंकुशे हे शुक्रवारी (ता. ३०) ज्योती (बीग) चीत्रपट परिसरातातील आठवडी बाजार करण्यासाठी रात्री आठच्या सुमारास आले होते. ते बाजार करत असतांना त्यांच्या बेसावधपणाचा फायदा बाजारमध्ये फिरणाऱ्या चोरट्यांनी घेतला. भाजीपाला खरेदी करण्याच्या नादात असलेल्या श्री. अंकुशे यांच्या खिशातील नऊ हजार ७०० रुपये किंमतीचा जे-२ सॅमसंग कंपनीचा मोबाईल अलगद काढून घेतला. काही अंतरावर गेल्यानंतर मोबाईल खिशात नसल्याचे श्री. अंकुशे यांच्या लक्षात आले. तोपर्यंत चोरट्यांनी त्या ठिकाणाहून पोबारा केला. त्यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. कदम हे करीत आहेत.

पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा मोबाईल पळविल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांना तर हे चोरटे कधीही हेरु शकतात. अशा घटनांमुळे चोरट्यांची हिंमत वाढत चालली असून आठवडी बाजार व गर्दीच्या ठिकाणी हे मोबाईल चोर सर्रास फिरतांना दिसत असून पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचे बोलल्या जात आहे.

Web Title: PIs mobile got stolen