लातूर : रिक्षात सापडले गावठी पिस्तूल

लातूर : रिक्षात सापडले गावठी पिस्तूल

लातूर : रिक्षातील साऊंड बॉक्समध्ये लपवून ठेवलेले गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मोबाईल चोरीचा तपास करताना आढळून आली; पण रिक्षा चालक पोलिसांच्या तावडीतून पळून गेला. दरम्यान, बेकायदेशिरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी नितीन उर्फ साैरभ दिलीप बिडगर (रा. दिपज्योतीनगर) या रिक्षा चालकाविरोधात गांधी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

हत्तेनगर भागात तुलसी नावाचे मोबाईलचे दुकान आहे. ते 18 फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. दुकानातील महागडे मोबाईल, लॅपटॉप असा तीन लाख 61 हजार 216 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. याबाबत किर्तीकुमार ललीतकुमार गटागट (रा. हत्तेनगर) यांनी लगेच गांधी चौक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलिस अधिक्षक काकासाहेब डाेळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुनील नागरगोजे यांनी पथक नेमले.

या पथकाकडून तपासणी करताना बिडगर आणि त्याच्या साथीदाराने हे मोबाईलचे दुकान फोडल्याची माहिती मिळाली. त्यानूसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्याचे नियोजन पोलिसांनी केले. बिडगर याच्याकडे एमएच २४ ई ८९९१ क्रमांकाचा अॅटोरिक्षा आहे. तो घेऊन बिडगर सिद्धेश्‍वर मंदिर मार्गाने येणार असल्याची माहिती पोलिसांना रविवारी (ता. १०) मिळाली. त्यानूसार पोलिसांनी हा रिक्षा अडविली. तेव्हा बिडगर याने ही रिक्षा थांबवून बाजूच्या शेतात पळ काढला. पाठलाग करूनही तो पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी रिक्षाची झडती घेतली तेव्हा रिक्षातील साऊंड बॉक्समध्ये गावठी पिस्तुल, एक जीवंत काडतूस यासोबतच दोन नवे मोबाईल आढळून आले. रिक्षासह 57 हजार 550 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com