गुन्हेगारांकडून जप्त केलेले पिस्तुल आमदारांचे

file photo
file photo

नांदेड : शहराच्या बाबानगर भागात ता. ११ सप्टेंबर- २०१९ च्या रात्री साडेनऊच्या सुमारास पोलिसांनी पकडलेल्या एका गुन्हेगाराकडून पिस्तुल जप्त केले होते. यावेली त्याच्यासह तिघांना अटक करून त्यांच्याविरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला होता. मुंबई येथील फॉरेन्सीक लॅबमध्ये हा पिस्तुल मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांचा असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. मात्र या प्रकरणी पोलिसांनी व स्व: आमदारांनी अत्यंत गोपनियता पाळून राजकिय दबावापोटी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार महोदयांचा शस्त्र परवानाच निलंबीत केल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.  

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाबनगर येथील सोमाणी हॉस्पीटलच्या समोर काही युवक भांडण करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांना मिळाली. यावरून त्यांनी शिवाजीनगर गुन्हे शाख पथकाला कळवून त्या ठिकाणी पाठविले. या पथकानी आपल्या वरिष्ठांसह घटनास्थळ गाठले. यावेळी पोलिसांनी दत्ता गजानन गायकवाड (वय २०) रा. नाईकनगर, आकाश गोविंद डुबूकवाड ( वय १९) रा. शाहूनगर आणि अर्जून मोरे (वय २२) रा. विष्णूनगर यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दत्ता गायकवाड याच्या ताब्यातून पिस्तुल व काडतुस, आकाशकडून तलावार जप्त करून या तिघांवर गुन्हा दाखल झाला. 

जिल्हाधिकाऱ्यांचा झटका

जप्त केलेले पिस्तुल तपासणीसाठी मुंबई फॉरेन्सीक लॅबकडे पाठविण्यात आले. तपासणीत हा पिस्तुल मुखेडचे भाजप आमदार डॉ. तुषार राठोड यांचे असल्याचे समजले. यावेळी पोलिसांनी गोपनियता पाळत आमदारांशी संपर्क साधला. यावेळी पिस्तुल चोरीला गेल्याचे त्यांनाही माहित नसल्याचे सांगितले. यावेली पोलिसांना चांगलाच पेच पडला. मात्र राजकिय दबाब वापरून हे प्रकरण पोलिस व आमदार दडपण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र हा अहवाल जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्याकडे आला असता त्यांनी आमदार डॉ. राठोड यांनी शस्त्र वापरण्यास निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांचा परवाना निलंबीत केल्याने ही धक्कादायक माहिती पुढे आले. 

शस्त्र बाळगण्याचा ट्रेंड

आपल्या जवळ शस्त्र दिसले म्हणजे आपली समाजात प्रतिष्ठा वाढते. अनेकजण आपल्याकडे कुतूहलाने पहातात. मात्र परवाना धारक शस्त्र मिळाल्यानंतर ते सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्या परवानाधरकावर असते. परंतु आमदार डॉ. तुषार राठोड यांनी निष्काळजीपणा केला. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पिस्तुल चोरल्याची माहितीच नव्हती.  

जप्त पिस्तुल काही गुन्ह्यात वापरले का ? चौकशी सुरू

आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या चोरलेल्या पिस्तुलचा वापर या गुन्हेगारांनी अन्य एखाद्या गंभीर गुन्ह्यात केला आहे का ? त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. मात्र एवढे मोठे प्रकरण दाबण्या मागचे काय कारण आहे हे मात्र समजु शकले नाही. पोलिस याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com