पिस्तूल पुरविणाऱयाला केजमधून अटक

हरी तुगावकर
सोमवार, 2 जुलै 2018

लातूर : राज्यभर गाजत असलेल्या स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांचा गोळी झाडून खून केल्याप्रकरणात आरोपीला पिस्तूल पुरवल्याच्या संशयावरून पोलिसांनी रविवारी (ता. १) रात्री केज (जि.बीड) येथून रमेश मुंडे (वय ३५) याला अटक केली आहे. त्याला सोमवारी (ता.२) येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्याला  न्यायालयाने 7 जुलैपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

येथील स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांचा सोमवारी (ता. २५)
मध्यरात्री येथील सरस्वती कॉलनी परिसरात शिवाजी विद्यालयाजवळ गोळी झाडून
खून करण्यात आला होता. या प्रकरणात चव्हाण यांचा एकेकाळचा भागीदार प्रा.
चंदनकुमार याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. यात चव्हाण यांच्यावर गोळी
झाडल्याचा संशय असणारा करण गहिरवार यालाही पोलिसांनी अटक केली होती.  त्याच्याकडून पिस्तूल, जीवंत काडतूसे, दोन लाख 31 हजार रुपयेही जप्त केले
होते. 

या प्रकरणातील करण गहिरवार याने बिहारमधून दीड लाखाला हे पिस्तूल मागवले. अंबा कारखान्याजवळ त्याला हे पिस्तूल संबंधीतांनी दिले. तेथे त्याने एक फायर करून ते चालते की नाही हे त्याने पाहिले होते. अशी माहिती त्याने तपासात पोलिसांना दिली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल पुरवठा करणाऱया व्यक्तीचा शोध सुरु
 केला होता. यातून पोलिसांनी केज (जि. बीड) येथून रविवारी रात्री रमेश मुंडे याला अटक केली आहे.

त्याने करणला पिस्तूल पुरविल्याचा त्याच्यावर संशय आहे. त्याला सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अशी माहिती पोलिस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली. दरम्यान मुंडे यानेपिस्तुल खरोखरच बिहारमधून मागवले होते का?, इतर कोणत्या ठिकाणाहून हे पिस्तुल आणले?, ते पिस्तूल करणलाच दिले का?, इतर कोणाला दिले याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

Web Title: The pistol supporter is arrested from Cage