समृद्धी महामार्गाजवळ बांधून देणार शेततळे 

राजेभाऊ मोगल 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

औरंगाबाद : नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन येत्या आठवडाभरात करण्याची तयारी केली जात आहे. तसेच यासाठी गौण खनिजाच्या मोबदल्यात कंत्राटदाराकडून शेतकऱ्यांना शेततळे खोदून देण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. महामार्गापासून दोन किलोमीटरवर एका - एका शेतकऱ्यांना दोनहून अधिक शेततळे खोदून दिले जाईल. तसेच यासाठी प्रशासन पन्नीदेखील उपलब्ध करून देणार आहे. 

राज्यातील दहा जिल्ह्यांतून जाणारा हा महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सातशेहून अधिक किलोमीटरच्या या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिज लागणार आहे. मात्र, महसूल विभागाने यासाठी सरकारी जमीन देण्यास नकार दिल्याने आता माती, मुरूम कुठून आणायचा, असा पेच निर्माण झाला होता. मात्र, त्यावर आता चांगला मार्ग काढला आहे. या महामार्गापासून दोन किलोमीटरवर शेतकऱ्यांना मोफत शेततळे खोदून दिले जाणार आहेत. त्याबदल्यात माती, मुरूम घेतली जाईल. मात्र, त्यावर रॉयल्टी माफ नसून प्रशासन त्या पैशांच्या मोबदल्यात भागीदार असेल. शेतकऱ्यांना जर दोनहून अधिक शेततळे पाहिजे असतील तर तसेही केले जाईल. 

का घेतला निर्णय? 
समृद्धी महामार्गाशेजारी शेतकऱ्यांना समृद्धी यावी, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. बऱ्याचदा रस्त्याच्या कामांसाठी सरकारी जमिनीतून गौण खनिज घेतले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी खड्डे खोदली जातात. कालांतराने ही खड्डे धोकादायक वाटू लागतात. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

समृद्धी महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिज लागेल. कंत्राटदाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे खोदून दिल्यास माती आणि मुरूम जवळ आणि सहज उपलब्ध होईल. या कामासाठी शेतकरी, कंत्राटदार आणि कृषी सहायक असे तीन जण महत्त्वाचे असतील. शेततळे खोदून झाल्यानंतर त्यासाठी लागणारी पन्ही शासनच उपलब्ध करून देईल. 
- उदय चौधरी, जिल्हाधिकारी 

Web Title: Plan to construct Farm pond on samruddhi highway