‘समृद्धी’वर विमानही उतरेल

आदित्य वाघमारे 
बुधवार, 4 जुलै 2018

औरंगाबाद - दहा जिल्ह्यांतून जाणारा, सातशे किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग कुठेही विमान उतरविण्यासाठी वापरला जाऊ शकणार आहे. सलग पाच किलोमीटरचा सरळ पट्टा असलेल्या रस्त्यावर विमान उतरविणे शक्‍य होईल. या महामार्गाचे रेखांकन केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे मुख्य अधिकारी राधेश्‍याम मोपलवर यांनी ‘सकाळ’ला दिली. 

नागपूर-मुंबई समृद्धी एक्‍स्प्रेस वेवर हवाईदलाची विमाने उतरविण्यासाठी आणि टेक ऑफ करण्यासाठी रनवेची सोय केली जाणार आहे. सध्या हे रनवे कुठे होणार याबाबात सांगण्यात आले नसले तरी जिथे पाच किलोमीटरचा सरळ स्ट्रेच (पट्टा) असेल तिथे रनवे म्हणून वापर शक्‍य असल्याची माहिती मोपलवार यांनी दिली. बई ते राज्याची उपराजधानी नागपूरदरम्यान प्रस्तावित असलेल्या या महामार्गावर लढाऊ विमाने उतरविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. साधारण पाच किलोमीटरची सरळ वाट असेल तिथे रनवे म्हणून वापर होईल. यासाठी महामार्गाचे रेखांकन (अलाइनमेंट) केंद्रीय संरक्षण मंत्रालयाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

सह्याद्रीच्या कुशीत रनवे नाही
महामार्गाच्या रेखांकनात अनेक ठिकाणी रस्त्याचे सरळ लांबलचक पट्टे आहेत. तथापि, नाशिक, ठाणे आणि मुंबई या भागांत ही परिस्थिती नाही. सह्याद्री पर्वतरांगांमधून जाणाऱ्या या रस्त्यावर परिस्थिती वेगळी आहे. सिन्नर-घोटी-ठाणे या मार्गावर मात्र अशा रनवेसाठी पूरक असे रेखांकन जवळपास राहणार नसल्याचे मोपलवार यांनी नमूद केले. 

वेग ताशी २५० किमी 
लढाऊ विमानाला रनवेवरील उड्डाण आणि लॅंडिंगसाठी २५० किलोमीटर प्रती तासापेक्षा अधिक वेग घेणे गरजेचे असते. याशिवाय सी-१७ ग्लोबमास्टर, सी-१३० हर्क्‍युलीस, एन-३२ यांसारख्या विमानांचे लॅंडिंगदरम्यानचे वजन पेलण्याची क्षमता असावी म्हणून रनवेला मजबूत करावे लागते. 

Web Title: plane land on samruddhi highway