बीड जिल्ह्यात सर्रास कॅरिबॅगचा वापर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

बीड - प्लॅस्टिकबंदीच्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता. २३) जिल्ह्यात प्लॅस्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर आढळून आला. बीड पालिकेने काही व्यापाऱ्यांना नाममात्र दंड केल्यामुळे अन्य व्यापाऱ्यांत भीती बसेल अशी सुतराम शक्‍यता नाही.

पर्यावरण विभागाने शनिवारपासून प्लॅस्टिक बंदी जाहीर केली. मात्र, बंदीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. प्लॅस्टिकबंदी, त्याचे दुष्परिणाम, त्यावर पर्याय आणि वापर झाल्यास दंड याबाबत कुठेही जनजागृती झाली नाही, हे विशेष. 

प्रसारमाध्यमांतून आलेल्या बातम्यांच्या माहितीवरून काही व्यापाऱ्यांनी ग्राहकांना कापडी पिशव्या उपलब्ध करून दिल्या असल्या तरी हे प्रमाण तुरळक होते. भाजीबाजार, खाद्यपदार्थांची दुकाने, फळविक्रेते आणि स्टेशनरी दुकानांमध्ये प्लॅस्टिक कॅरिबॅगचा शनिवारी सर्रास वापर होताना दिसला. यातून कारवाईचा धाक नसल्याचे स्पष्ट झाले. 

दरम्यान, बीड पालिकेने प्लॅस्टिक कॅरिबॅग वापर करणाऱ्या ११ व्यापाऱ्यांना दंड केला असला तरी हा दंड अगदीच नगण्य होता. प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरणारा पहिल्यांदा आढळल्यानंतर पाच हजार रुपये दंडाची कायद्यात तरतूद असताना बीडमध्ये ५० रुपयांप्रमाणे दंड घेतला. एकूणच दंडाच्या रकमेतून पालिकेच्या पथकाने दोन शून्यच वगळले. यामुळे पहिल्याच दिवशी प्लॅस्टिकबंदीचा फज्जा उडाला.

Web Title: plastic carry bag use in beed district