अजूनही बंदी नावालाच... प्लॅस्टिकचा सुटेना विळखा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

जालना - राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही जालना शहरामध्ये सर्रास प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर होत आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी आजही प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. त्यामुळे प्लॅस्टिकबंदी खरंच झाली का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जालना शहरामध्ये सुमारे ६० ते ८० टन कचरा रोज जमा होतो. या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचे प्रमाण आजही मोठ्या प्रमाणावर आहे. ही अवस्था प्लॅस्टिक बंदीनंतरही कायम आहे, हे विशेष.

सद्यःस्थितीमध्ये  देखील शहरात प्लॅस्टिक कॅरिबॅगसह पाणी पाऊच अस्ताव्यस्त पडलेले दिसून येत आहेत. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या निर्णयानुसार ५० मायक्रॉन खालील प्लॅस्टिक कॅरिबॅगच्या वापरावर बंदी आहे, तर राज्य शासनाने प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरावर बंदी आणली आहे. प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर नगरपालिकेने पाणी पाऊच उत्पादकांसह प्लॅस्टिक कॅरिबॅग डीलर यांना नोटिसा बजावल्या आहेत. 

मात्र, या नोटिसांना न जुमानता सध्या प्लॅस्टिक कॅरिबॅगचा शहरात पुरवठा होत असून त्या राजरोसपणे वापरल्या जात आहेत. मात्र, तरी देखील कारवाईच्या नावाने काहीच हालचाली नाहीत. परिणामी प्लॅस्टिक बंदीनंतरही अद्याप तरी जालना शहर प्लॅस्टिक मुक्त झाले नाही, हे वास्तव आहे. 

त्यामुळे आता नगरपालिकेकडून प्लॅस्टिक कॅरिबॅग पुरवठा करणाऱ्यांसह वापरणाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे; तेव्हाच नागरिक कापडी पिशव्यांचा वापर करण्यावर जोर देतील. 

Web Title: plastic issue in jalana

टॅग्स