esakal | राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत यश मिळविलेल्या महाराष्ट्र संघात हिंगोलीतील खेळाडूचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

उत्तर प्रदेश राज्यातील  आग्रा या ठिकाणी सहा मार्च ते  आठ मार्च दरम्यान झालेल्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्रातील संघाने कास्य पदक मिळवले असून या संघामध्ये मुंबई, सोलापूर, कोल्हापूर तसेच बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूचा समावेश होता.

राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत यश मिळविलेल्या महाराष्ट्र संघात हिंगोलीतील खेळाडूचा समावेश

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झालेल्या ३३ व्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्र संघाने कास्य पदक मिळवले. या संघामध्ये हिंगोली जिल्ह्यातील बासंबा सज्जाचे तलाठी म्हणून कार्यरत असलेले हर्षवर्धन गवई यांचा समावेश असल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा या ठिकाणी सहा मार्च ते आठ मार्च दरम्यान झालेल्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्रातील संघाने कास्य पदक मिळवले असून या संघामध्ये मुंबई, सोलापूर, कोल्हापूर तसेच बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूचा समावेश होता. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेले व हिंगोली तालुक्यातील  बासंबा गावाला गेल्या दोन वर्षांपासून तलाठी म्हणून कार्यरत असलेले हर्षवर्धन गवई यांचा सुद्धा या संघामध्ये समावेश होता.

महाराष्ट्रातील या संघाने उत्तर प्रदेश, बिहार तसेच जम्मू काश्मीर आदी संघाचा पराभव करून राज्यस्तरावर महाराष्ट्र संघाने कास्य पदक मिळवले असून उत्तर प्रदेश रेल्वे महाप्रबंधक श्रीनिवास यांच्या हस्ते महाराष्ट्र संघाला कास्य पदक प्रदान करण्यात आले. या संघात बुलढाणा जिल्हातुन सहभागी झालेले  हिंगोली महसूल विभागात बासंबा या गावात तलाठी म्हणून कार्यरत असलेले हर्षवर्धन गवई यांचा समावेश असल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. शासकीय सेवेत असून विविध स्पर्धेत भाग घेऊन राज्य स्तरावर नावलौकिक केल्याबद्दल हर्षवर्धन गवई यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image