ना स्वच्छतागृहात पाणी, ना मुलींच्या वसतिगृहाला सुरक्षारक्षक

सुशील राऊत 
Sunday, 1 December 2019

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर तीन दिवसांपासून राज्यस्तरीय आंतरशालेय हॅन्डबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत 542 खेळाडू सहभागी झाले असून, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कुठे अस्वच्छ स्वच्छतागृह, निकृष्ट जेवण, तर कुठे पाणीदेखील नाही. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षारक्षकच नाही, अशी अवस्था आहे.

आयोजकांनी निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याचे खेळाडुंनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले. जेवणाच्या निकृष्ट चवीमुळे राज्यस्तरीय स्पर्धेची चव घालवल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी, शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर तीन दिवसांपासून राज्यस्तरीय आंतरशालेय हॅन्डबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत 542 खेळाडू सहभागी झाले असून, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कुठे अस्वच्छ स्वच्छतागृह, निकृष्ट जेवण, तर कुठे पाणीदेखील नाही. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षारक्षकच नाही, अशी अवस्था आहे.

आयोजकांनी निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याचे खेळाडुंनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले. जेवणाच्या निकृष्ट चवीमुळे राज्यस्तरीय स्पर्धेची चव घालवल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी, शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

No photo description available.

जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व विभागीय क्रिडा संकुल समितीतर्फे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय हॅंन्डबॉल स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूर, नागपूर, अमरावती, नाशिक व शासनाच्या क्रिडा प्रबोधनीतील एकूण 542 खेळाडु आणि 36 शिक्षक आले आहेत. एकेका छोट्या खोलीमध्ये तब्बल 18 ते 20 विद्यार्थी, शिक्षकांना कोंबण्यात आले होते. परंतु वसतिगृहात येताच विद्यार्थ्यांना अस्वच्छ खोल्यांचे दर्शन घडले. विद्यार्थ्यांनी स्वतः खोल्या साफ केल्याचे सांगितले. अस्वच्छ शौचालय असल्याने खेळाडुंची चांगलीच गैरसोय झाली.

हेही वाचा - उद्योगांना चार लाख कोटींची कर्जमाफी

फक्त कागदोपत्री नॉनव्हेज

प्रत्येक खेळाडूमागे राहण्या-जेवणासाठी 150 रूपये आले आहेत. शासन निर्णयाप्रमाणे जेवणात केळी, दुध, पोहे, उपमा, उसळ, वरण, भात, पोळ्या, दोन भाज्या, लोणचे हे पदार्थ दिल्याचे तोंडी सांगितले. तर मांसाहारी खेळाडूंना अंडी, चिकन देण्याचे नमूद असल्याचे क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे यांनी सांगितले. मात्र, रोज दूध सोडाच, जेव्हा मिळाले, तेव्हाही त्यात भरपूर पाणी मिसळलेले होते, असे विद्यार्थी म्हणाले. भाज्यांमध्ये शिमला मिर्ची, सोयाबीन, बटाटे, घुगऱ्या, कच्च्या पोळ्या आणि फक्त एका दिवशी गोड पदार्थ मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

Image may contain: indoor

आयोजक म्हणतात...

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पोलिसांच्या स्पर्धा झाल्या. त्यानंतर आम्ही वसतिगृहाची पूर्ण स्वच्छता केली होती. मात्र खेळाडुंनी मैदानावरचा राग जर वसतिगृहात काढला असेल, नंतर घाण झाली असेल, तर सांगता येत नाही. खेळाडुंसाठी आम्ही चार स्वच्छता कर्मचारी नेमले आहे. तर मुला-मुलींच्या दोन वस्तीगृहांसाठी रात्री एक सुरक्षारक्षक नेमला आहे, असे श्री. तांदळे म्हणाले.

No photo description available.

खेळाडू म्हणतात...

तीन-चार वर्षांपासून प्रत्येक स्पर्धेत आम्ही सहभागी होतो. दरवेळी ढिसाळ नियोजनाचा नाहक त्रास आम्हाला सहन करावा लागतो. गाव सोडुन मोठ्या अपेक्षांनी आम्ही औरंगाबाद शहरात आलो होतो. मात्र आम्हाला खेळापेक्षा गैरसोयीलाच सामोरे जावे लागले. वेळेवर स्वच्छतागृहात पाणी नव्हते, तर वस्तीगृहात पिण्याच्या पाण्याचा पत्ताच नव्हता.
- कार्तिक (नाव बदलले आहे.)

मुलींच्या वस्तीगृहात स्वच्छतागृहात दुर्गंधी, अस्वच्छता असल्याने सुरवातीला खूप त्रास झाला. आम्हाला ते वापरण्याची इच्छाही होत नव्हती. परंतु स्पर्धा असल्याने नाईलाजाने आम्हाला या सर्व समस्या सहन कराव्या लागल्या. मुले थोडेफार ऍडजस्ट करू शकतात, मात्र मुलींनी काय करावे?
- पूनम (नाव बदलले आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Players Faced Problems in National Handball Competition in Aurangabad