'चोर-पोलिस' खेळ बंद करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

लातूर : गेल्या काही महिन्यांपासून शहर व जिल्ह्यात चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. आठवड्यातून किमान दोन-तीन चोरीच्या घटना घडत आहेत; पण पोलिसांच्या हाती अद्याप चोरटे लागत नाहीत. याची दखल नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी घेतली. चोर-पोलिसांचा खेळ बंद करून चोरट्यांना जेरबंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. इतकेच नव्हे, तर ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, पण तपास काहीच नाही अशा पोलिस अधिकाऱ्यांना "कंट्रोल रूम' दाखवा असे आदेशही त्यांनी दिले आहेत. 

नागरिकांत अस्वस्थता वाढली 
गेल्या काही महिन्यांपासून शहर व जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीसोबतच दिवसाही घरफोड्या होत आहेत. अनेक ठिकाणच्या घरफोड्या सीसीटीव्हीत कैदही झाल्या आहेत. आठवड्यातून दोन-तीन घरफोड्या होत आहेत. घरफोड्यांसोबतच मोटारसायकल चोरीचे प्रमाणही वाढले आहे. दररोज कोठे ना कोठे मोटारसायकल चोरी होत आहे. त्यामुळे नागरिकांत अस्वस्था पसरली आहे. आता समोर दुष्काळ आहे. यात चोऱ्यांचे प्रमाण पुन्हा वाढणार असल्याने नागरिकांत भीती आहे. 

पथके करतात तरी काय? 
वाढत्या चोऱ्या लक्षात घेऊन पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक, शहरातील चारही पोलिस ठाण्यांच्या डीबी शाखेचे पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अशी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत; पण या पथकांकडून कारवाई मात्र काहीच होताना दिसत नाही. 

गेल्या तीन-चार दिवसांपासून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील हे लातूर दौऱ्यावर आहेत. 
या दौऱ्यात त्यांनी चोऱ्यांचा आढावाही घेतला आहे. तपास होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे, तर ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चोऱ्या वाढल्या आहेत, पण तपास काहीच नाही अशा पोलिस अधिकाऱ्यांना कंट्रोल रूम दाखवा असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: Please stop the game of police and theft