Vidhan Sabha 2019 : काँग्रेस घेत आहे शेवटचा श्वास : मोदी

PM Narendra Modi rally at Partur Jalna
PM Narendra Modi rally at Partur Jalna

परतूर (जालना) : 'आदर्श स्वातंत्र्यसेनानी असलेला काँग्रेस पक्ष आता घराणेशाहीच्या दाबावाखाली इतका दबला आहे की आता काँग्रेस शेवटचा श्वास घेत आहे. काँग्रेसनेही स्विकारलंय की ते आता स्वातंत्र्यसेनानींचा पक्ष राहिलेला नाही,' अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परतूर येथील जाहीर सभेत केली. अकोल्यानंतर आज (ता. 16) त्यांची सभा जालन्यातील परतूर येथे झाली. मोदींनी 'पुन्हा आणूया आपले सरकार' अशी मराठीत घोषणा दिली.

'राष्ट्रवादीतील नेत्यांनी दुनियाभरच्या पद्धती वापरून महाराष्ट्रात भ्रष्टाचार केला आहे. देशही यांचे सगळे कारनामे बघत आहे. योग्य वेळ आली की मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीला बरोबर उत्तर देईल. राष्ट्रहिताच्या आणि देशाच्या सुरक्षेबाबत सर्व पक्षांचे एकमत असले पाहिजे, पण 370 कलम हटविण्याबाबत विरोधकांनी प्रचंड विरोध केला. 370 वर प्रेम असेल तर ते जिथं गाडलं आहे, तिथे चादर वाहून या. सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी आपल्या लष्काराचा अपमान केलाय. केवळ आपल्या स्वार्थासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या पोळ्या भाजून घेतल्या,' अशी टीका करत मोदींनी काँग्रेस आघाडीवर निशाणा साधला.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अशा भ्रष्ट प्रकारांमुळे त्यांच्यातील बडे बडे नेतेही महायुतीत आले आणि मला विश्वास आहे की, जे नेते त्यांच्या राहिले आहेत, तेही 21 तारखेला आम्हालाच मत देतील, असा टोला मोदींनी लगावला. तसेच 'मतदानाच्या अदल्या दिवशी रविवार आल्याने लागून सुट्या आल्या आहेत, मात्र सुट्या आल्यामुळे बाहेर जाऊ नका, तर आपल्याच घरी राहून मतदान करा' असे आवाहन मोदींनी जालनाकरांना दिले आहे. 

मराठवाड्यावर अन्याय
काँग्रेस आघाडीचे तीन मुख्यमंत्री असूनही मराठवाड्यावर अन्याय झाला. मराठवाड्यातील जनतेचाल विकास करायच्याऐवजी विरोधकांनी आपला व आपल्या परिवाराचाच विकास केला, मात्र मराठवाडा वंचितच राहिला असा आरोप मोदींनी विरोधकांवर केला. 

'सबका साथ सबका विकास'
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्वाधिक जनता विमा सुरक्षित झाली आहे. सर्व स्तरातील लोकांना सेवा मिळू लागली आहे. बंजारा समाजासाठी विशेष योजना अमलात आणल्या जात आहेत. गावागावत गॅस कनेक्शन मिळाले, शौचालये आली, मुस्लिम भगिनींना तिहेरी तलाकपासून आम्ही मुक्त केले, असेही यावेळी मोदींनी सांगितले.

मोदींच्या आज राज्यात तीन सभा आहेत. तर महाराष्ट्रभरात मोदी 9 सभा घेतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com