डॉक्टर महिलेला विष पाजून मारण्याचा प्रयत्न; सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 9 एप्रिल 2019

उमरी बाजार (ता. किनवट) येथील प्राथमीक आरोग्य केंद्र परिसरात राहणाऱ्या डॉ. रेखा अंबादास खर्जुले (वय 32) यांना मागील काही दिवसांपासून तिला सासरची मंडळी व्यवसाय टाकण्यासाठी माहेरहून दहा लाखाची मागणी करून सतत त्रास देत होती.

नांदेड : व्यवसाय टाकण्यासाठी माहेराहून दहा लाखाची मागणी करून एका डॉक्टर महिलेचा मानसिक व शारिरीक त्रास देऊन तिला वीष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मांडवी पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उमरी बाजार (ता. किनवट) येथील प्राथमीक आरोग्य केंद्र परिसरात राहणाऱ्या डॉ. रेखा अंबादास खर्जुले (वय 32) यांना मागील काही दिवसांपासून तिला सासरची मंडळी व्यवसाय टाकण्यासाठी माहेरहून दहा लाखाची मागणी करून सतत त्रास देत होती. पीडीत महिला डॉक्टरनी पोलिस अधिक्षक गाठले. तु तिथे का गेली म्हणून शिविगाळ व मारहाण करून तिचा छळ वाढत गेला. तसेच आमची मुलगी आम्हाला दे असे म्हणून त्रासून सोडले. एवढेच नाही तर चक्क ता. 5 एप्रिलला सकाळी 8 च्या सुमारास वाद घालून तिला जंतुनाशक विष जबरीने पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत तिला किनवट येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

एएलसीवरून सोमवारी (ता. 8) दुपारी अडीच वाजता मांडवी पोलिसांनी डॉ. रेखा खर्जूले यांच्या फिर्यादीवरुन पती सुजीत विजयराव मानकसे, सासरा विजयराव मानकसे, सासू सुरेखा मानकसे आणि दीर प्रतिक मानकसे सर्व राहणार पुसद (जि. यवतमाळ) यांच्याविरूध्द ठार मारण्याचा प्रयत्न, हुंडाबळीसह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. केंद्रे हे करीत आहेत.

Web Title: poison given to daughter in law by her in laws

टॅग्स