एकाच कुटुंबातील पाच मुलींना विषबाधा; जुळ्या बहिणींचा मृत्यू

एकाच कुटुंबातील पाच मुलींना विषबाधा; जुळ्या बहिणींचा मृत्यू

औसा : उजनी (ता. औसा) येथील एकाच कुटुंबातील पाच मुलींना विषबाधा झाली. यामध्ये अडीच वर्षांच्या जुळ्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.8) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. या पाच मुलींपैकी दोघींवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून, यातील एकीची प्रकृती चिंताजनक आहे. 

उजनी येथील आयुब बशीर रुईकर यांच्या पाच मुलींना विषबाधा झाली. या मुलींना दुपारपासूनच मळमळ, उलट्या व चक्कर येण्याचा त्रास सुुरु झाला. हा त्रास नेमका कशाने झाला, हे अद्याप समजलेले नाही. दरम्यान, या मुलींना उपचारासाठी नेत असताना आलमास व मारीया या जुळ्या बहिणींचा (वय- अडीच वर्षे) मृत्यू झाला. उर्वरित तीन बहिणींपैकी महेक (वय-11 वर्षे) व सुहाना (वय-7) या मुलींवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाचवी मुलगी आलसियाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. 

दरम्यान, या मुलींनी रात्री शिजवलेला भात खाल्ला होता आणि दूधही घेतले होते. त्यामुळे ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे समजून घेण्यासाठी पोलिसांनी भात, चहा, साखर व दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com