उशिरापर्यंत मद्यपान करणाऱ्यांना पोलिसांचा ईंगा

उशिरापर्यंत मद्यपान करणाऱ्यांना पोलिसांचा ईंगा

नांदेड : रात्री उशिरापर्यंत मद्यपान करणाऱ्या सोळा मद्यपींना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई विभागीय गस्तीवर असलेले पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी हॉटेल तांडा बार येथे रविवारी (ता. 11) मध्यरात्री एक वाजता केली. 

पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांच्या आदेशावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे हे शनिवारी (ता. 10) ते रविवारी (ता. 11) दरम्यान शहरात विभागीय गस्तीवर होते. वजिराबाद ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल तांडा बार ही रात्री उशिरापर्यंत सुरू असून मद्यपान करण्यासाठी ग्राहक बसलेले असल्याची माहिती सुरवसे यांना मिळाली. त्यांनी वजिराबाद ठाण्याचे निरीक्षक संदीप शिवले यांच्याशी संपर्क साधून फौजदार विक्रांत हराळे यांना सोबत घेऊन तांडा बारवर रविवारी (ता. 11) मध्यरात्री एक वाजता छापा टाकला. यावेळी हॉटेलचे अनिकेत राठोड, व्यवस्थापक शशिकांत धुतराज यांच्यासह मद्यपान करणाऱ्या मद्यपींचे चित्रीकरण करून त्यांनाही अटक केली. रात्रीच त्यांची शासकिय रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या प्रकरणी फौजदार विक्रांत हराळे यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे आहेत मद्यपी ग्राहक...

धम्मा वामनराव गायकवाड, पावडेवाडी नाका, अमित कुंजीपत सरमल रा. पद्मावती गल्ली, परळी (बीड), आयुब इलियाज खान जिल्हा परिषद कॉलनी, तरोडा नाका, बालाजी बळीराम पाटील समतानगर, पावडेवाडी नाका, धम्मा हेमेश पेटने चिखलवाडी, विनय भिमराव पंडीत विकासनगर राजकॉर्नर, दिलिपसिंह मदनसिंह ठाकूर रेणूका मंदीर, गाडीपूरा, रमेश रामराव नखाते रा. अर्धापूर, रवी रामभाऊ, पद्मावती गल्ली, परळी, भागवत चंद्रकांत पेंडकर गायत्री गल्ली मुखेड, पुंडलीक मारोतराव बारसे अर्धापूर, शाहेद शेख खाजा वसमत, अजय प्रकाश भालेराव समतानगर पावडेवाडी नाका, कुणाल सोनबा दिवेकर समतानगर पावडेवाडी नाका, चेतन चंद्रकांत भूजबळ सांगवी सिध्दार्थ नगर आणि चंद्रकांत पंडीतराव बांतेवाड रा. मंडलापूर, मुखेड हे मद्यपान करून गैरवर्तन करतांना पोलिसांना सापडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com