esakal | जुगार अड्ड्यावर छापा; पावणेसात लाखांचा ऐवज जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

photo

वसमत येथे पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास छापा टाकला असता येथे काही जण झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. शहरात अनेक दिवसानंतर मोठी कारवाई झाली असून इतर ठिकाणच्या जुगारअड्ड्यावरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

जुगार अड्ड्यावर छापा; पावणेसात लाखांचा ऐवज जप्त

sakal_logo
By
पंजाब नवघरे

वसमत (जि. हिंगोली) :  येथे झन्ना मन्ना नावाचा जुगार अड्ड्यावर स्‍थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता.१६) पहाटेच्या सुमारास धाड टाकून जुगाऱ्यांकडून सहा लाख ८३ हजार ६६० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी ३१ जणांवर कारवाई करण्यात आली.

वसमत येथील भगवते बारच्या वर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून येथे पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास छापा टाकला असता येथे काही जण झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या वेळी त्‍यांच्याकडून एक लाख ७८ हजार ४०० रुपये नगदी, चार हजार २६० रुपयांचे जुगाराचे साहित्य, दोन लाख एक हजार रुपयांचे २२ मोबाईल, तीन लाख रुपये किमंतीच्या सहा दुचाकी असा एकूण सहा लाख ८३ हजार ६६० रुपयांचा ऐवज जप्त केला.

हेही वाचासव्वा लाखाचे पाणी पाऊच साहित्य जप्त

वसमत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  

या बाबत स्‍थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून पंकज पती (गणेशपेठ), फारूकी फैमोद्दीन (मुशाफीरशहा मोहल्ला), विक्रम चापोते (शहरपेठ), प्रेम कदम (अशोकनगर), राधाकिशन जाधव (लैन तलाब), शेख मुजाहिद, (लैन तलाब), किशोर कलाल (मंगळवारपेठ), शिवाजी काळे (ब्राम्‍हणगल्‍ली), चंद्रकांत मंचेवार (बुधवारपेठ), पवन धोंडी (गणेशपेठ), किशन वड्डीपल्‍ली (शहरपेठ), शहद पौळ (शहरपेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बार मालकाचाही समावेश

तसेच मारोती पवार (शहरपेठ), नागनाथआप्पा पेनूर (काळीपेठ), आशीष गायकवाड (डॉ. आंबेडकरनगर), किरण दुमाने (काळीपेठ), पंडित झुंझुर्डे (रा. टाकळगाव), संजीव आहेर (शहरपेठ), अविनाश भीमटवार (पावरलुम), अमोल बिरादार (गणेशपेठ), शेख इस्‍माईल (रा. चंदगव्हाण), गणेश भालेराव (शहरपेठ), राजेश लांडगू (काळीपेठ), गुलाब भोसले (भोसले गल्‍ली), रामराव हुंबाड (रा.माळापूर), एकनाथ गायकवाड (रा. सती पांगरा), प्रकाश काळे (मंगळवारपेठ), इंद्रप्रसाद कोरडे (रा. माळापूर), हरून हनवते (वसमत), शेख फारूक (वसमत) व बार मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथे क्लिक कराहिंगोली जिल्ह्याची दुसऱ्या स्थानावर झेप

जुगार अड्ड्यातून लाखोंची उलाढाल

तालुक्यात जुगार अड्डे सुरू असल्याचे या कारवाईवरून समोर आले आहे. एकाच वेळी जवळपास ३० जुगारी आढळून आल्याने जुगार अड्ड्याचे स्वरूप लक्षात येते. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून आणखी काही ठिकाणी जुगारअड्डे असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी धाड सत्र राबवून ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, तालुकाभरात ठिकठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे वादाचे प्रकार घडत असून व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. याकडे लक्ष देऊन अवैध दारू विक्री बंद करावी, अशी मागणी होत आहे.     

loading image