आयपीएस नुरुल हसन यांची आयपीएल सट्टाबहादरावर कारवाई

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 11 मे 2018

6 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सट्टाबाजाराची मोठी कारवाई ठरली.

नांदेड - उमरी शहरात धर्माबाद उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक नुरूल हसन यांनी आयपीएल सट्टा अड्डयावर गुरुवारी (ता. 10) मध्यरात्री छापा टाकला. डावावरून सय्यद सादक सय्यद पाशा, सय्यद सादीक समद पाशा आणि शे. मुजीब शे. हाजीमिया या तिघांना अटक केली. डावावरून दोन एलईडी टीव्ही, एक लॅपटॉप, 15 मोबाईल, सीमकार्ड आणि नगदी असा 6 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सट्टाबाजाराची मोठी कारवाई ठरली. उमरी ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास पीआय संदिपन शेळके हे करत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Police action on IPL betting