समाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नांदेड :  पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना जपा असा सल्ला देत समाजातील दृष्टी असलेल्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून दुर्जनांवर मात करावी असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी केले. 

नांदेड :  पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना जपा असा सल्ला देत समाजातील दृष्टी असलेल्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून दुर्जनांवर मात करावी असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी केले. 

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या वतीने मिनी सह्याद्री विश्रामगृहात बकरी ईद व गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही यासाठी सर्व धर्मियांची शांतता समिती बैठक आयोजीत केली होती. यावेळी उपस्थितींना पाटील मार्गदर्शनपर बोलत होते. समाजकारणी व राजकारणी तसेच विधायक दृष्टी असलेल्या नागरिकांनी सर्व धर्मियांचे सन उत्सव साजरे होत असतांना दुर्जनांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. स्वार्थी व संकुचीत राजकारण करता कामा नये. तसेच पोलिसांनी लोकाभिमुख होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. समाजकंटकावर आमची सायबर गस्त लक्ष ठेवून असते. सज्जनानी येणाऱ्या काळात सर्च उत्सव आनंदाने साजरे करा व पोलिसांनाही साजरे करण्यास मदत करा. असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पोलिस अधिक्षक संजय जाधव म्हणाले की, शांतता हे विकासाचे लक्षण आहे. नांदेडच्या शांततेला गालबोट लागणार नाही याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. कुठलाही धर्म हा हिंसा करायला शिकवित नाही. परंतु काही समाजकंटक विघातक कारवाया करुन समाजात अशांतता पसरवितात. त्यांना धडा शिकविण्यासाठी पोलिस दल सज्ज आहे. संकट काळात माणूसच मदतीला धावून येतो. सर्वांनी आपण सगळे एक आहोत ही भावना जपली पाहिजे.

ईद व येणाऱ्या सर्व उत्सवांच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.  यावेळी रमेश सोनाळे, अब्दुल रौफ, अशोक उमरेकर, दुष्यंत सोनाळे यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकिला महापौर शिला भवरे, किशोर भवरे, शिवसेनेचे शहर प्रमुख दत्ता कोकाटे, शाम कोकाटे, सदाशिव पुरी, डॉ. एन. के. सरोदे, डीवायएसपी अभिजीत फस्के, पोलिस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे, अनिरूध्द काकडे, संदीप शिवले, सुनील निकाळजे यांच्यासह आदी उस्थित होते.

Web Title: Police are on the streets for the welfare of society said Fatech Singh Patil