जाळून खून केल्याप्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

लातूर - वलांडीजवळ (ता. देवणी) तळेगाव (भोगेश्‍वर) मार्गावर असलेल्या अचवला बेटाजवळ जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाबाबत पोलिसांनी उलगडा केला असून या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली. 

वलांडीजवळ असलेल्या अचवला बेटाजवळ सोमवारी (ता. 23) सकाळी जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता; पण दोन दिवसांपूर्वीच उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात सुनील मानकरी (रा. बनशेळकी) हे बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यात आली होती. त्यात हा मृतदेह सापडल्याने पोलिसांनी मानकरी यांच्या कुटुंबीयांना बोलावून घेतले होते. त्यांनी हा मृतदेह सुनील मानकरी यांचाच असल्याची ओळख पटवली होती. या प्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हाही नोंद करण्यात आला होता. तपास करून बस्वराज अंबेगावे व हनुमंत अंबेगावे या दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. राठोड यांनी दिली.

Web Title: Police arrested two person