राज्य राखीव दलाचा पोलिसच निघाला मंगळसूत्र चोर

मनोज साखरे
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

चक्क राज्य राखीव दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याने तब्बल तीन मंगळसूत्र हिसकावल्याचे समोर आले. त्याला सातारा पोलिसानी अटक केली.

औरंगाबाद : ज्याने सुरक्षा करायची तोच चोर निघाला तर? असाच काहीसा प्रकार औरंगाबादेतील सातारा परिसरात उघडकिस आला. चक्क राज्य राखीव दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याने तब्बल तीन मंगळसूत्र हिसकावल्याचे समोर आले. त्याला सातारा पोलिसानी अटक केली.

योगेश शिनगारे असे संशयित पोलीसाचे नाव असून तो मूळ अकोला येथील आहे. कर्जबाजारीपणा व जुगाराच्या नादापायी त्याने हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले. अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रेमसागर चांद्रमोरे यांनी सांगितले.

Web Title: police becomes a chain snatcher in aurangabad