औरंगाबाद : दंगलीतील संशयितांना परत ताब्यात घेतल्याने तणाव

मनोज साखरे
मंगळवार, 26 जून 2018

औरंगाबाद : औरंगाबादेत घडलेल्या दंगलीत संशयावरून सहा जणांना अटक झाली होती, ते जामीनावरून सुटताच पोलिसानी त्यांना परत दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. या कारवाईला विरोध करत सिटीचौक पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव जमुन त्यांनी घोषणाबाजी सुरु केली आहे.

अकरा व बारा मे रोजी जुन्या औरंगाबादेत मोठी दंगल उसळली होती, यात सुमारे अकरा कोटींपेक्षा अधिक नुकसान आणि दोन जीव गेले होते. सूत्रांनी माहिती दिली की, दंगलप्रकरणी पोलिसांनी अटकसत्र राबवले. यात सहा संशयितांनाही अटक झाली होती. त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यांची नुकतीच सुटका झाली. मात्र त्यांना परत एका गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले. याचा रोष त्यांच्या नातेवाईक व ते राहत असलेल्या परिसरात आहे. त्यांना ताब्यात घेतल्यामुळे मोठा जमाव सिटीचौक पोलिस ठाण्यासमोर जमला असून त्यांनी  पोलिसांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. या घडामोडीनंतर व्यापाऱ्यांनी सतर्कता म्हणून बाजारपेठ बंद केली आहे. दरम्यान पोलिसांचा येथे बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

Web Title: police cal suspects again so violence in aurangabad