हद्दपारीचा आदेश धुडकवणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

नांदेड : शहराच्या बालाजीनगर भागात राहणाऱ्या तीन महिलांना उपविभागीय दंडाधिकारी यांनी हद्दपार केले होते. परंतु, आदेशाचे उल्लंघन करून येथेच वास्तव्य करणाऱ्या सदरील महिलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : शहराच्या बालाजीनगर भागात राहणाऱ्या तीन महिलांना उपविभागीय दंडाधिकारी यांनी हद्दपार केले होते. परंतु, आदेशाचे उल्लंघन करून येथेच वास्तव्य करणाऱ्या सदरील महिलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानतळ ठाण्याच्या हद्दीत बालाजीनगर भागात राहणाऱ्या तीन महिलांवर वेगवेगळे गंभीर प्रकरणातील गुन्हे दाखल असल्याने त्यांना हद्दपार करावे, असा अहवाल तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरभाष राठोड यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना पाठविला होता. सदर महिलांनी पोलिस पथकावर हल्ला करून अधिकारी व कर्मचाऱ्याना मारहाण केली होती. आलेला अहवाल हा गंभीर असल्याने समाजातील शांतता भंग होऊ नये म्हणून उपविभागीय दंडाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी तिन्ही महिलांना एक वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार केले होते.

परंतु, या आदेशाचे उल्लघंन करत सदरील महिला ह्या नांदेडातच वास्तव्यास आहेत. त्यांना अनेक वेळा नोटीसा देऊनसुद्धा त्या नोटीसा घेत नाहीत. उलट पोलिसांशी वाद घालतात. अखेर विमानतळ ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या फिर्यादीवरुन विमानतळ ठाण्यात हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस फौजदार श्रीमती कानडे ह्या करीत आहेत.

Web Title: police case registered against women