लाच घेण्याचा मोह पोलिसास भोवला अन्...

hingoli photo
hingoli photo

हिंगोली : तालुक्‍यातील मालसेलू येथील जागेचा जुना वाद मिटविण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या बिट जमादारास लाचलुचपत पथकाने रविवारी (ता. २४) रंगेहात पकडले.

हिंगोली तालुक्यातील मालसेलू येथे अनेक वर्षांपासून जागेचा वाद आहे. हा वाद न्यायालयात सुरू असून या जागेत अतिक्रमण करण्यात आलेले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रारदाराने तक्रार दिली होती. त्यानुसार बिट जमादार नंदकिशोर मस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. 

२५ हजार रुपयांची मागणी

नंतर अतिक्रमण हटवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्याने थेट लाचलुचपत कार्यालय गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पडताळणी करण्यात आली होती. 

शेतशिवारात सापळा रचला

त्यानुसार लाचलुचपत विभागाचे उपाधीक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, पोलिस निरीक्षक ममता अफुणे व इतर कर्मचाऱ्याच्या पथकाने रविवारी माळसेलू येथील शेतशिवारात सापळा रचला.

रंगेहात पकडले

 या वेळी दहा हजार रुपये स्वीकारताना बिट जमादार नंदकिशोर मस्‍के याला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

नियमांचे उल्‍लघंन २३ विक्रेत्यांना भोवले

हिंगोली : शहरात सुरू असलेल्या आपत्ती व्यवस्‍थान कायद्याचे उल्‍लंघन करणाऱ्या फिरते दुकानदार, फळ, कापड, अशा २३ दुकानदारांवर रविवारी (ता. २४) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या बाबत नगरपालिकेचे शहर अभियान व्यवस्‍थाक पंडित मस्‍के यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून शहरातील सचिन कुरील, मोहमद अदिल, शैलेश कुरील (चप्पल दुकानदार), शेख वहिद, शेख कलीम (फिरते कापड विक्रेते), लक्ष्मीबाई कुलकर्णी (फळविक्रेते), विजया घोडेकर, रंजना घोडेकर (बांगडी विक्री), सय्यद मुजाहीद (फिरते कटलरी) यांचा समावेश आहे.

विविध वस्तू विक्रेत्यांचा समावेश

 गौस शेख (फिरते मसाला विक्रेते), मोहमद मुजीब (फळविक्रेते), दत्तस्‍तगीर (फळविक्रेते), घनश्याम साहू (चिवडा विक्री), शेख शकील, शेख जावेद, शेख गौस (फिरते ड्रायफूड), मोहम्मद नाहेद, मोहम्मद जावेद (फळविक्री), शेख जमीर (मटन विक्री), प्रशांत शिंदे (महासेल कापड दुकान), इलिसास (व्हारायटी क्लॉथ सेंटर), शेख इसलाक (कापड दुकान), राजकुमार चंदनानी (कॅश काऊंटर रेडीमेड कापड दुकान) यांच्याविरुद्ध जिल्‍हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com