पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

औरंगाबाद - औरंगाबाद शहर पोलिस परिमंडळ दोनचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली. त्यांच्याविरोधात महिला पोलिसाच्या २२ वर्षीय मुलीने नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची तक्रार व्हॉट्‌सॲपद्वारे शहर पोलिसांना पाठविली. 

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती ‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी करीत आहे. चार महिन्यांपूर्वी श्रीरामे यांच्याशी तिची ओळख झाली. श्रीरामे यांनी पोलिस दलात नोकरीचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी चार ते पाच वेळेस अत्याचार केले. त्या वेळी ते दारूच्या नशेत होते. या प्रकारानंतर ते टाळू लागले. यानंतर आठ जूनला एमआयडीसी सिडको येथील घरी बोलावून श्रीरामे यांनी मारहाण केली, असाही आरोप तरुणीने तक्रारीद्वारे केला. दरम्यान, तपास पारदर्शक व्हावा, या उद्देशाने श्रीरामे यांना सुटीवर पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

Web Title: Police Commissioner Rahul Shriram has been charged with sexual harassment