बीड : तरुणीने केले ब्लॅकमेल, पोलिसाची डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 December 2019

एका तरुणीकडून होत असलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय आहे. सुसाईड नोटमध्ये तसा मजकूर आणि तरुणीचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

बीड - जिल्हा पोलिस दलात कार्यरत कर्मचाऱ्याने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्‍यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील धांडेनगर परिसरातील शेतात आज (ता. 17) सायंकाळी उघडकीस आली. दिलीप प्रकाश केंद्रे (वय 32) असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली. एका तरुणीकडून होत असलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय आहे. सुसाईड नोटमध्ये तसा मजकूर आणि तरुणीचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पूर्वी जळगाव पोलिस दलात कार्यरत असलेले दिलीप केंद्रे वर्षभरापूर्वी बदली करून बीड जिल्हा पोलिस दलात रुजू झाले. दिलीप केंद्रे यांची नेमणूक शिवाजीनगर पोलिस ठाण्यात होती, तर ते सध्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. दरम्यान, शहरातील धांडेनगर भागातील रेल्वे ट्रॅकजवळ असलेल्या शेतात एका व्यक्तीने गोळी
झाडून घेतल्याची माहिती मंगळवारी सायंकाळी पोलिसांना मिळाली.

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे व शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता हा मृतदेह दिलीप केंद्रे यांचा असल्याचे समोर आले. त्यांनी डोक्‍याच्या डाव्या बाजूस गोळी मारल्याचे दिसून आले. त्यांच्या डाव्या हातामध्ये ड्युटीवरची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर होती.
त्यामध्ये एकच गोळी होती. तीच गोळी स्वतःवर झाडून घेऊन त्यांनी आत्महत्या केली. घटनास्थळी गोळीची रिकामी कॅप आढळून आली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला असून, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. 

हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह  

जळगाव पोलिस दलात झाले होते भरती 
2010 मध्ये दिलीप केंद्रे हे जळगाव पोलिस दलात भरती झाले होते. फेब्रुवारीत त्यांची बीड येथे बदली झाली. यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेमणूक होऊन त्यांची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे अंगरक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. 

Image may contain: 1 person, standing, outdoor and nature

ब्लॅकमेलिंगमुळे उचलले पाऊल 
जळगाव येथील एका तरुणीकडून दिलीप केंद्रे यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला. त्यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली आहे. अद्याप पोलिसांनी मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Commit Suicide at Beed