परभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित

police
police

परभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी निलंबित केले आहे.

परभणी पोलिस दलातील हे 12 पोलीस कर्मचारी गेल्या काही महिन्या पासून सतत गैरहजर राहत असत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हे कर्मचारी गैरहजर होते. काही कर्मचारी बेशिस्त वर्तणूक करत होते. त्यांना समज देणात आली असली तरी त्यांच्या वर्तणूक मध्ये बदल झाला नसल्याने पोलिस अधीक्षकांनी शुक्रवारी (ता. 16) रात्री हा निर्णय घेतला आहे.

निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कारभारी वाघमारे, राजेश वाजपेयी, श्रीधर खोकले, गजानन पाटील, व्यंकट बिलापट्टे, विजय उफाडे (सर्व पोलीस मुख्यालय, परभणी), निहाल अहेमद नूर पटेल, सुरेश पानपट्टे (जिंतूर पोलीस ठाणे), संतोष जोंधळे (पाथरी पोलिस ठाणे), संतोष जाधव, सुरेश मोरे (नानल पेठ पोलीस ठाणे) यांचा निलंबित कर्मचाऱ्या मध्ये समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com