लातूरच्या सराफाला पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

नांदेड : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी लातूर येथून मोठ्या शिताफीने नांदेड पोलिसांची डोकेदुखी बनलेल्या पत्रेकापू गॅंगला अटक केली. या गॅंगने शहर व जिल्ह्यात मागील पाच महिण्यापासून वजिराबाद, इतवारा, मुदखेड, मुखेड आणि किनवट परिसरात पत्रे कापून दुकाने फोडून लाखोंचा एेवज पळविला होता. या प्रकरणात लातूरच्या एका सराफाला शनिवारी (ता. २७) अटक केली असून त्याच्याकडून १४ चांदीचे शिक्के जप्त केले. 

इतवारा भागातील कापड दुकान टार्गेट करत लाखोंचा एेवज या पत्रेकापू गॅंगने लंपास केला होता. तर ५० हून अधिक दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला होता. यामुळे व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या निषेधार्थ बंद पाळला होता. याबाबत पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे आणि पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पांडूरंग भारती व त्यांच्या पथकांनी या गॅंगच्या सुसक्या आवळल्या. लातूर शहरातील लातूर अर्बन को. ऑप. बॅँकेची कांही संशयास्पद व्यक्ती रेकी करत असल्याच्या हालचाली पोलिसांना मिळाली. तपासावर असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांनी आपल्या पथकासह सापळा लावून बुधवारी (ता. २४) रात्री एकच्या सुमारास लातूर येथून श्रीनिवास उर्फ सिनु राजेश्‍वर कर्पे (वय २२) रा. गांधी चौक निझामबाद, तेलंगणा, ह. मु. पनवेल मुंबई, सय्यद यासीन सय्यद याकुब (वय ३१) रा. जयनगर, हनुमान मंदीरासमोर, लातूर आणि शेख फारूख शेख मोहमद उर्फ शेख सलीम (वय २१) रा. चांडेश्वर, लातूर या तिघांना अटक केली.

चौकशीत त्यांनी नांदेड, मुदखेडमध्ये दुकाने फोडल्याची कबुली दिली. जिल्ह्यात त्यांच्यावर १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणाचा तपास मुदखेडचे एपीआय नितीन खंडागळे हे करीत असून त्यांनी चोरीचे सोने खरेदी केलेल्या अमोल मुरलीधर वन्नेकर (वय ३४) रा, शिवाजीनगर, लातूर याला अटक केली. त्याच्या दुकानातून चांदीचे १४ शिक्के व सय्यद यासीन याच्याकडून  १५ हजार रुपये पोलिस कोठडी दरमम्यान जप्त केले. हे चारही जण सध्या पोलिस कोठडीत आहेत. 
 
Web Title: Police custody in Latur's Saraf