दुचाकी चोरट्यास पोलिस कोठडी

file photo
file photo

नांदेड : शहरातील विविध भागात गर्दीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरी करणारा चोरटा वजिराबाद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या. त्याला न्यायालयासमोर सोमवारी (ता. २७) हजर केले असता अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. एस. पाटील यांनी दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

शहरात दुचाकी व मोबाईल चोरांनी आपले डोके वर काढले आहे. आठवडी बाजार, बसस्थानक, रेल्वेस्थानक, चित्रपटगृह यासह गर्दीच्या ठिकाणी दुचाकी चालकांनी लावलेली दुचाकी त्यांची नजर चुकवत दुचाकी चोरीची घटना घडत होती. यामुळे वाहनधारक भयभीत झाले होते. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेसह शहरातील सर्व ठाणेदारांना व गुन्हे शोध पथकांना पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर,  अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांनी सुचना दिल्या होत्या. त्या सुचनांचे पालन करत वजिराबादचे पोलिस निरिक्षक संदीप शिवले यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पुंगळे यांना आपल्या हद्दीत गस्त वाढविण्यास सांगितले. 

काटेरी झुडूपातून तीन दुचाकी जप्त 

यावरून श्री. पुंगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रविवारी (ता. २६) दुपारी गस्त घालत असतांना खुराणा ट्र्व्हल्सच्या रस्त्यावर माता गुजरीजी कॉम्पलेक्स परिसरात काटेरी झुडूपात एक तरूण बसलेला त्यांनी माहिती मिळाली. यावरून हे पथक तेथे पोहचताच काटेरी झुडपातून एक तरूण बाहेर पडत होता. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने संघरत्न विलास दिपके असे नाव सांगितले. त्याला सोबत घेऊन पुन्हा पोलिसांनी काटेरी झुडपात शोध घेतला असता त्या ठिकाणी तीन चोरीच्या दुचाकी सापडल्या. 

चोरट्यास दोन दिवसाची पोलिस कोठडी

याबाबत त्याला विचारण केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. या दुचाकींची किंमत जवळपास ९० हजार रुपये असल्याची नोंद पोलिसांनी वजिराबाद ठाण्यात केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पुंगळे यांच्या फिर्यादीवरुन संघरत्न दिपकविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. त्याला श्री. पुंगळे यांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश एस. एस. पाटील यांनी दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार श्री. सय्यद करत आहेत. या चोरट्यांकडून अजून काही दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलसांनी वर्तविली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com