शिरूर अनंतपाळमध्ये अवैध वाळू उपसा प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल

शिरूर अनंतपाळमध्ये तीन ट्रॅक्टरसह एका जेसीबी जप्त
Illegal Sand Mining In Latur
Illegal Sand Mining In Laturesakal

शिरूर अनंतपाळ (जि.लातूर) : तालुक्यातील हालकी येथील मांजरा नदीत अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या तीन ट्रॅक्टरसह एका जेसीबी जप्त करुन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तिघांना पोलीस कोठडी सुनावली असून पाच जण फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हालकी येथील हेळंबे यांच्या शासनाने अधिग्रहण केलेल्या मांजरा नदी जवळील शेतात मोठ्या प्रमाणात विनापरवाना अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस ठाण्यास मिळाली होती. (Police File Cases Against 8 People For Illegal Sand Mining In Shirur Anantpal Of Latur)

Illegal Sand Mining In Latur
Aurangabad Accident | औरंगाबादमध्ये मोठा अपघात; ४ ठार अन् ३ गंभीर जखमी

त्याप्रमाणे शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून धाडी टाकून तीन वाळूनी भरलेली ट्रॅक्टर व ट्रॅक्टरमध्ये वाळू टाकणारा जेसीबी ताब्यात घेऊन पोलीस कर्मचारी संदीप टिपराळे यांच्या फिर्यादीवरून आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना अटक करून न्यायालयात नेले असताना त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून फरार पाच आरोपींना पोलिसांकडून शोध सुरु असल्याची माहिती या प्रकरणाचा तपास जमादार गोविंद मलवाडे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com