esakal | बीडच्या पोलिस दलात मोठे फेरबदल
sakal

बोलून बातमी शोधा

Harsh-and-Bharat

या अधिकाऱ्यांच्या बदल्या
माजलगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत यांची पुन्हा जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक म्हणून नेमणूक झाली. केजचे पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला यांची व्हीआयपी सुरक्षा शाखेत बदली करण्यात आली. परळी शहर ठाण्याच्या सहायक निरीक्षक सुरेखा धस यांची जिल्हा वाहतूक शाखेत, वडवणीचे सुरेश खाडे यांची परळी शहर, दिंद्रूडचे सहायक निरीक्षक सचिन पुंडगे यांची नेकनूर, नेकनूरचे सहायक निरीक्षक महेश टाक यांची वडवणी येथे बदली करण्यात आली. संभाजीनगर ठाण्यातील सलीम पठाण यांची आष्टी ठाण्यात बदली झाली. यासह १७ फौजदारांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

बीडच्या पोलिस दलात मोठे फेरबदल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तीन निरीक्षक, सहा सहायक निरीक्षक आणि १७ फौजदारांच्या बदल्या, भारत राऊत यांच्याकडे ‘एलसीबी’ची धुरा
बीड - पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मंगळवारी (ता. तीन) जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल केले. तीन पोलिस निरीक्षकांसह सहा सहायक पोलिस निरीक्षक आणि १७ फौजदारांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले. लक्ष लागून असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक म्हणून भारत राऊत यांची नेमणूक करण्यात आली. या खुर्चीवर बसण्यासाठी विविध पद्धतीने ताकद लावलेल्या अनेकांचा हिरमोड झाला.

दरम्यान, पोलिस प्रमुखांचे वसुली केंद्र आणि अलीकडे तर थेट वाळू ठेकेदरांकडून थेट ‘हप्त्यांचे’ आरोप झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेमुळे पोलिस दलाचीच प्रतिमा मलिन झाली होती. आता गुणवान, आरोपमुक्त, उत्कृष्ट सेवा असलेला अधिकारीच या पदावर असेल असे खुद्द पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सोमवारी (ता. दोन) सांगून मंगळवारी या ठिकाणी राऊत यांची नेमणूक केली. त्यामुळे आता कारभार सुधारून मलिन झालेली पोलिस दलाची आणि स्थानिक गुन्हे शाखेची प्रतिमा उजाळण्याचे दिव्य त्यांना पेलावे लागणार आहे. 

या पदावरून घनश्‍याम पाळवदे तीन दिवसांपूर्वी निवृत्त झाले. त्यामुळे या पदावर बसण्यासाठी प्रचलित पद्धतीने विविध माध्यमांतून ‘लॉबिंग’ झाले. मात्र, सर्वांचा हिरमोड करीत आणि प्रचलित पद्धतींना झुगारत पोद्दार यांनी ही धुरा राऊत यांच्या शिरावर दिली आहे. मात्र, आता राऊत ती कशी पेलणार, याकडे लक्ष लागले आहे. ठराविक ठिकाणी कारवाया, प्रमुखांसाठी ‘खास काम’, प्रमुखांची आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांची मर्जी सांभाळायची आणि या खुर्चीवर बसून मनमर्जी करायची, असा प्रकार मागच्या काळात घडला होता. न्यायालयाने जामीन दिलेल्यांनाही समज देण्याच्या नावाखाली बोलावून ‘वसुली’ करणारी आणि अवैध धंदेवाल्यांशी संधान साधून नियमित हजेरी लावून त्यांचा पाहुणचार घेऊन खिसे गरम करून आणणारी मोठी यंत्रणाच काम करीत होती. त्यात वाळूमाफीयांनी मात्र या विभागाची चांगलीच पोलखोल केली होती. त्याची चौकशीही सुरू असून आता त्यातून काय बाहेर पडते, हे पाहणेही औत्सुक्‍याचे असेल. मात्र, हे सर्व प्रकार आता नव्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळत थांबतील, अशी अपेक्षा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या विशेषणांवरून तरी आहे.

loading image
go to top