घंटागाडी-दुचाकीच्या अपघातात पोलिस जखमी  

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 22 जुलै 2019

- शहर वाहतुक शाखेतील पोलिस शिपाई तुकाराम तुरटवाड हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

- हा अपघात सोमवरी (ता. २२) सकाळी दहा वाजता शासकिय दुधडेअरी समोर घडला. त्याच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले.

नांदेड : शहर वाहतुक शाखेतील पोलिस शिपाई तुकाराम तुरटवाड हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवरी (ता. २२) सकाळी दहा वाजता शासकिय दुधडेअरी समोर घडला. त्याच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले.

पोलिस मुख्यालय मैदानावर सोमवारी (ता. २२) सकाळी कवायत करून ते आपल्या घुंगराळा येथील घराकडे जात होते. यावेळी महापालिकेची घंटागाडी याच रस्त्याने जात होती. अचानक ही गाडी समोर आल्याने त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि घंटागाडी गाडीवर जावून धडकली.

यात तुरटवाड हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने विष्णुपूरी येथील शासकिय रुगाणालयात दाखल केले. रुग्णालयात नांदेड ग्रामिणचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, वाहतुक शाखेचे एपीआय  नाईक यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी भेट दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A police injured in an accident