पोलिस निरीक्षकाने केली मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

औरंगाबाद - तक्रारीची प्रत मागण्यासाठी गेलेल्या दिव्यांग मुलीला हर्सूल पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाने मारल्याचा आरोपी मुलीसह तिच्या पालकांनी केला. या प्रकरणात पोलिस आयुक्तांनी चौकशीचे निर्देश उपायुक्तांना दिले. मात्र, मुलगी व पालकांनी केलेला आरोप खोटे असून, त्यात तथ्य नसल्याचे पोलिस निरीक्षकांनी आपली बाजू स्पष्ट केली.

बेरीबाग, हर्सूल परिसरात अकबरखान यांच्या पत्नीच्या नावावर हैदराबाद येथे प्लॉट आहे. या प्लॉटच्या खरेदी विक्रीवरून त्यांचा जिया उर रहेमान या नातेवाइकासोबत वाद सुरू आहे. याबाबत अकबरखान यांच्या अपंग मुलीच्या फोनवर ११ मे रोजी संशयित जिया उर रहेमान यांनी धमक्‍या दिल्या. या प्रकरणी मुलगी रफतखान अकबरखान हिने हर्सूल पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली. सोमवारी रफतखान ही मुलगी तक्रारीची प्रत घेण्यासाठी ठाण्यात गेली. तेव्हा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी तिला तुम्ही खोटी तक्रार दिली, असे म्हणत मारहाण केली, असा आरोप मुलीसह नातेवाइकांनी केला. मारहाणीत त्यांच्या पायाला बुटाची लाथ मारल्याने व्रण उमटल्याचेही तिने सांगितले. या प्रकरणानंतर रफतखान व तिचे पालक मंगळवारी (ता. २२) पोलिस आयुक्तांकडे तक्रार देण्यासाठी आले असता, आयुक्तांनी उपायुक्त राहुल श्रीरामे यांना चौकशीचे निर्देश दिले. त्यानंतर आयुक्तालयातच दोन्ही बाजू ऐकून चौकशी करण्यात आली.

Web Title: Police Inspector beating

टॅग्स