पोलिस निरीक्षकाची स्वतःवर गोळी झाडुन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

गोंदी (जि. जालना) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील  गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल परजणे यांनी शुक्रवारी (ता. 15)  सकाळी साडेदहा वाजन्याच्या दरम्यान स्वतःवर गोळी झाडुन आत्महत्या केली. मात्र आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल परजने हे गोंदी पोलिस ठाणे येथे कार्यरत होते. त्यांनी शुक्रवारी (ता.15) सकाळी गोंदी पोलिस वसाहतीतील निवासस्थानी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडुन  आत्महत्त्या केली. या घटनाची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक चैतन्य एस यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी  दाखल होत आहे. दरम्यान  मागील तीन दिवसांपासून सहाय्यक  पोलिस निरीक्षक अनिल  परजने हे निराश होते  मात्र त्यांच्या आत्महत्याचे कारण अद्याप समजले नाही.

Web Title: Police inspector commit suicide