घरात बसा अन् कोरोनाला हरवा, लातुर, उदगीरात पोलिसांचे पथसंचलन

Police's Warning March, Latur, Udgir
Police's Warning March, Latur, Udgir

लातूर ः कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपाय योजना केल्या जात आहेत. नागरीकांना वारंवार सूचनाही देण्यात येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. यातून पोलिस दलाच्या वतीने गुरुवारी (ता.नऊ) सकाळी शहरातून वाहनाद्वारे पथ संचलन करण्यात आले.
कोरोना विषाणु सर्वत्र पसरू नये या करीता देशभरात टाळेबंदी करण्यात आली आहे. राज्यात संचारबंदी सुरु आहे. प्रत्येक जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. लातुरातही संचारबंदी आहे.

पहिले काही दिवस पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्या, सकाळी फिरणाऱ्यांना काठीचा प्रसाद दिला. नंतर मात्र पोलिसांनी मवाळ भूमिका घेतली होती. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांचीही संख्या वाढू लागली होती. त्यात गुरुवारी (ता.नऊ) पोलिसांनी शहरातून वाहनाद्वारे पथ संचलन करण्यात आला. अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या संचलनामध्ये शहरातील पाचही पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, चार्लीचे पथक सहभागी झाले होते. सध्या संचारबंदी सुरु आहे, घरातच बसून रहा. अनावश्यक घराबाहेर पडू नका. घरात बसून तुम्ही व तुमचे कुटुंब सुरक्षित ठेवा.

घरात बसून कोरोना आपण हरवू असे संदेश यावेळी देण्यात येत होते. या संचलनाला शिवाजीनगर पोलिस ठाण्यापासून सुरवात झाली. खोरीगल्ली, उस्मानपूरा, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, मिनी मार्केट, गांधी चौक, सरकारी रुग्णालय, कन्हेरी चौक, नाईक चौक, कोकाटेनगर, राजस्थान शाळा, देशिकेंद्र विद्यालय, शिवाजी चौक, राजीव गांधी चौक, जुना औसा रस्ता, आशियाना टी पाँईट, सरस्वती कॉलनी, खाडगाव रोड, दयानंद महाविद्यालय या मार्गाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या संचलनाचे समाप्ती झाली.


 पोलिसांचा उदगीरात पथसंचलन
उदगीर (जि.लातूर) : कोरोना आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले टाळेबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने पोलीस विभागाच्या वतीने गुरुवारी (ता.नऊ) शहरातील गर्दीच्या मार्गावर पथ संचलन काढण्यात आला. संचारबंदीची व कोरोना संसर्गजन्य पार्श्वभूमी नागरिकांच्या लक्षात यावी म्हणून पोलीस निरीक्षक व अधिकारी कर्मचाऱ्यांचा जवळपास १०० ते १२० पोलिसांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणी हे संचलन केले. यामुळे शहरात पोलीस सतर्क असल्याचे वातावरण निर्माण झाले.


शहर पोलीस ठाण्यातून निघालेला हे पथ संचलन कॉर्नर चौक, खलील मेडिकल, खडकाळी पानचक्की, हावगीस्वामी चौक, चौबारा, आर्यसमाज, हनुमान चौक, मुक्कावार चौक या मार्गावरून परत पोलीस ठाण्यात संचलनाचा समारोप करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने व उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश शर्मा, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील, व्यंकट एडके, साहदेव खेडकर यांच्यासह शहर पोलीस, मुख्यालय पोलीस व आरसीपीचे पोलीस या पथ संचलनात सहभागी झाले होते.

नागरिकांत खळबळ....
अचानक शंभर पोलिसांचा ताफा पोलीस गाड्यासह रस्त्यावरून जात असल्याने याची कोणालाही कल्पना नसलेल्या शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेच्या अंमलबजावणीसाठी हा पोलिसांचा पथसंचलन असल्याचे कळल्यानंतर नागरिकांनी निःश्वास सोडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com