पोलिस अधिकाऱ्यासह अन्य पाच जणांवर गुन्हा

Police officer and five other accused
Police officer and five other accused

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ते एका व्यक्तीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यासह अन्य पाच जणांवर गोरेगाव पोलीस ठाण्यात सोमवार (ता 3) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. 

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील शेषराव खिलारी यांनी सोमवारी (ता.3) त्यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी घटनास्थळावर सापडलेल्या चिठ्ठीमध्ये गावातील अशोक जाधव कुटुंबिय व  पोलीस प्रशासन आत्महत्येस जबाबदार असल्याचे नमूद केले होते.

त्यामुळे खिल्लारी यांच्या कुटुंबीयांनी पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी लावून धरली होती. यामुळे पोलिस अधीक्षक योगेश कुमार पोलिस उपाधीक्षक डॉक्टर सिद्धेश्वर मोरे हे रात्री उशिरापर्यंत गोरेगाव पोलिस ठाण्यांमध्ये ठाण मांडून होते. त्यानंतर रात्री उशिरा राहुल खिल्लारी यांच्या तक्रारीवरून अशोक शंकर जाधव रमेश शंकर जाधव व अन्य तिघांसह पोलिस अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यामध्ये नेमके पोलिस अधिकारी कोण याची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेचा तपास पोलिस उपअधीक्षक डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com