पोलिस उपनिरीक्षक लाच घेताना जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

हट्टा (ता. वसमत) - येथील पोलिस उपनिरीक्षक शुद्धोधन जोंधळे यास दहा हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी (ता. 16) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

हट्टा (ता. वसमत) - येथील पोलिस उपनिरीक्षक शुद्धोधन जोंधळे यास दहा हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी (ता. 16) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

वगरवाडी तांडा (ता. औंढा नागनाथ) येथील एकाच्या ट्रॅक्‍टरचा ट्रॉलीसह अपघात झाला होता. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. जामीन मिळण्यासाठी मदत, जप्त केलेला ट्रॅक्‍टर-ट्रॉली सोडण्यासाठी जोंधळे याने पंधरा हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर आज दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते. संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केल्यानंतर सापळा रचून जोंधळे यास पकडले.

Web Title: police officer arrested in bribe case