शहर पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

औरंगाबाद - शहर पोलिस दलातील १४ निःशस्त्र पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी (ता. ३१) काढण्यात आले. शुक्रवारी सकाळी नवीन बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले आहेत. 

यात गुन्हे शाखेत कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तेथे मधुकर सावंत यांची वर्णी लागली आहे. वेळेत पदभार हस्तांतरण करण्यासाठी परिमंडळ-एक व दोनच्या उपायुक्तांना दक्षता घेण्याचे आदेशात म्हटले आहे.

नऊ सहायक निरीक्षक, ३९ उपनिरीक्षकांच्या बदल्या
प्रशासकीय कारणावरून नऊ सहायक पोलिस निरीक्षक व ३९ उपनिरीक्षकांच्या गुरुवारी (ता. ३१) बदल्या करण्यात आल्या आहेत. 

सायबर सेलचे सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर यांची नांदेड येथे बदली झाली. त्यांच्या जागी मुकुंदवाडी ठाण्याचे राहुल खटावकर यांची बदली झाली. साईनाथ गिते यांची मुकुंदवाडीतून जिन्सी येथे, अशोक आव्हाड यांची पुंडलिकनगर येथून बेगमपुरा येथे, विवेक पेन्शनवार यांची नियंत्रण कक्षातून क्रांती चौक पोलिस ठाण्यात बदली झाली. देवचंद राठोड यांची सिटी चौक येथून मुकुंदवाडी येथे, वामन बेले यांची मुकुंदवाडी येथून सातारा येथे, विजय घेरडे यांची क्रांती चौक येथून एमआयडीसी वाळूज येथे बदली झाली. दीपाली भागवत-निकम या पैरवी येथे असून, त्यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली. क्रांती चौक ठाण्याचे शेख अकमल मुस्तफा यांची शहर वाहतूक शाखेत बदली झाली. याशिवाय शहर पोलिस दलातील ३९ उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी ता. एक जूनला सकाळी बदलीच्या ठिकाणी कार्यभार घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: police officer transfer