...अन्यथा पोलिस अधीक्षकांना वॉरंट बजावू - खंडपीठ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या विश्‍वस्त मंडळाविरोधात निकाल लागल्यानंतर घरावर मोर्चा काढण्यात आल्याचे; तसेच पोलिस संरक्षण काढल्यासंदर्भात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती मंगेश एस. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली.

औरंगाबाद - शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या विश्‍वस्त मंडळाविरोधात निकाल लागल्यानंतर घरावर मोर्चा काढण्यात आल्याचे; तसेच पोलिस संरक्षण काढल्यासंदर्भात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती मंगेश एस. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. याप्रकरणी पोलिसांनी शपथपत्र दाखल न केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

सुनावणीअंती खंडपीठाने नगर पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांना 18 एप्रिल रोजी सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच, या दिवशी हजर न राहिल्यास व शपथपत्र दाखल न केल्यास पोलिस अधीक्षकांना आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी अटक वॉरंट बजाविण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Web Title: Police Officer Warrant Court