पोलिस भरती प्रक्रियेचे सहा महिने राहणार बॅकअप

उमेश वाघमारे
गुरुवार, 22 मार्च 2018

पोलिस भरती प्रक्रियेमध्ये अनेकदा उमेदवारांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लाटण्याचे प्रकार घडतात. तसेच भरती प्रक्रियेमध्ये घोळ घालून उमेदवारांना अधिकचे मार्क देऊन भरती केल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र हा सर्व प्रकार टाळण्यासाठी जालना पोलिस प्रशासनाने पोलिस भरती प्रक्रिया ही पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केला आहे.

जालना - सध्या सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत मानविहस्तशेप कमी करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेमध्ये होणाऱ्या घोळाला आळा बसला असून या पोलिस भरती प्रक्रियेचे संपूर्ण रेकॉर्डचे सहा महिने बॅकअप ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी ’सकाळ’शी बोलताना सांगितले आहे. 

पोलिस भरती प्रक्रियेमध्ये अनेकदा उमेदवारांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लाटण्याचे प्रकार घडतात. तसेच भरती प्रक्रियेमध्ये घोळ घालून उमेदवारांना अधिकचे मार्क देऊन भरती केल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र हा सर्व प्रकार टाळण्यासाठी जालना पोलिस प्रशासनाने पोलिस भरती प्रक्रिया ही पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केला आहे. यामध्ये दिल्ली येथील एका खासगी कंपनीकडून उमेदवारांच्या 100 मीटर आणि 1600 मीटर धावण्याची वेळ मोजण्यासाठी आरआफआडी सिस्टिमचा वापर केला आहे. आरआफआडी सिस्टिममुळे प्रत्येक उमेदवारांचा धावण्याचा वेळ थेट संगणकात संग्रहित होत आहे. तसेच बायोमेर्ट्रीक हजेरी, आरीस स्कॉनरचा वापर केला जात आहे. 20 सीसी टीव्ही कॅमेरे आणि 20 मूव्हिंंग कॅमेरे ही या भरती प्रक्रियेवर नजर ठेवून आहेत. या सर्व बाबींमुळे भरती प्रक्रियेतील घोटाळे थांबण्यास मदत झाली असून उमेदवारांच्या शंकांनाही स्थान राहिले नाही. परिणामी पोलिस भरती प्रक्रियेमध्ये जो उमेदवार सक्षम आहे, त्याला कोणी अडवू शकत नाही, आणि जो उमेदवार कमकुवत आहे, त्याला कोणी वाढीव मार्क देऊन भरती करू शकत नाही. विशेष म्हणजे या सर्व बाबींचे रेकॉर्ड सहा महिने ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पारदर्शक पोलिस भरती प्रक्रियेचा उद्देश पूर्ण होत असल्याचे बोलले जात आहे.
 

Web Title: The police recruitment process backup will remain for six months