डमी परिक्षार्थी प्रकरणात सहा जणांना अटक

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 7 मे 2018

सीआयडीचे पोलिस अधिक्षक शंकर केंगार आणि डीवायएसपी नानासाहेब नागदरे यांच्या पथकांनी रविवारी सहा जणांना अटक केली आहे. त्यात अर्धापूर येथील कनिष्ठ अभियंता स्वप्नील शिवाजी पवार, सुनिल बन्सी राठोड (अभियंता) आणि नुकताच या परिक्षेत पास झालेला शिवप्रसाद विजय डुमले यांना अटक करण्यात आली आहे. 

नांदेड : राज्यभर गाजत असलेल्या डमी परिक्षार्थी प्रकरणात सीआयडी विभागाच्या विशेष पथकाने रविवारी (ता.६) सहा जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यात दोन अभियंते असल्याचे सांगण्यात आले.

विविध स्पर्धा व सरळ परिक्षेत तसेच एमपीएससी अशा महत्वाच्या परिक्षेत डमी परिक्षार्थी बसवून लाखोंची उलाढाल करणारी टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता. मागील वर्षापासुन या प्रकरणात जवळपास तीसहून अधिक जण अटक करण्यात आले आहेत . त्यापैकी अनेक जण अजूनही कारागृहात आहेत.

सीआयडीचे पोलिस अधिक्षक शंकर केंगार आणि डीवायएसपी नानासाहेब नागदरे यांच्या पथकांनी रविवारी सहा जणांना अटक केली आहे. त्यात अर्धापूर येथील कनिष्ठ अभियंता स्वप्नील शिवाजी पवार, सुनिल बन्सी राठोड (अभियंता) आणि नुकताच या परिक्षेत पास झालेला शिवप्रसाद विजय डुमले यांना अटक करण्यात आली आहे. तिघांची नावे समजू शकली नाही. या सहा जणांना आज सोमवारी (ता. सात) किनवट न्यायालयात हजर करणार असल्याचे नागदरे यांनी सांगितले.

Web Title: police recruitment scam in Nanded

टॅग्स